कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेजच्या बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स् (एंटायर) भाग 1, 2 व 3 वर्गातील विद्यार्थ्यांच्या कला गुण व संशोधनास वाव देण्यासाठी Techno Spark 2025 कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख पाहुणे मा. प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणित विभाग प्रमुख प्रा.एस.पी.थोरात हे होते.
सदर कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार म्हणाले, विद्यार्थ्यांनी उपलब्ध असलेल्या संधी व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन आपले करिअर घडवावे. तर अध्यक्षीय भाषणात बोलताना प्रा.एस. पी. थोरात यांनी या कार्यक्रमाव्दारे विविध स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमांतर्गत प्रश्नमंजुषा, कोडींग, टेक्नो रांगोळी, पोस्टर प्रदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथमेश कारंजकर, वैष्णवी ढवरे प्रथम क्रमांक, कोडींग स्पर्धेत पारस माने व विवेक प्रधान प्रथम क्रमांक, टेक्नो रांगोळी स्पर्धेत सुहानी हुच्चे,आर्या दंडगे, अभिषेक देसाई प्रथम क्रमांक ,पोस्टर प्रदर्शन स्पर्धेत अमृता पाटील, वर्षा पाटील व दीक्षा पाटील यांचा प्रथम क्रमांक आला. विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र, मेडल देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिव प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे, प्रा.सी.बी.पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. कार्यक्रमाचे आयोजन बी.सी.एस. विभागप्रमुख प्रा.पल्लवी देसाई यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी होणेसाठी प्रा.आर.आर.माने, प्रा. एन.एन.बरगाले, प्रा व्ही सी दळवी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार आर. बी.जोग व विभागातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.