मंत्री मुश्रीफांच्या हस्ते शिरोळ येथील स्पंदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन 

कोल्हापूर : शिरोळ येथील स्पंदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन मंत्री मुश्रीफांच्या हस्ते करण्यात आले. अद्यावत व सर्व सोयीनियुक्त हॉस्पिटलमध्ये गोरगरिबांना सवलतीच्या दरामध्ये सेवा द्यावी व येणारा पेशंट बरा होऊन हसत सुखरूप घरी गेला पाहिजे. अशा प्रकारच्या शुभेच्छा मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.

 

 

यावेळी डॉ. डी वाय पाटील युनिव्हर्सिटी पुणेचे कुलपती डॉ. पी डी पाटील, सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार विशाल पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार डॉ अशोकराव माने, माजी आमदार उल्हास दादा पाटील, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, अनिलराव यादव, जनसुराज्य पक्षाचे युवाशक्ती प्रदेशाध्यक्ष समित कदम, पृथ्वीराज यादव, केडीसीसी बँकेचे जनरल मॅनेजर गजानन देसाई, डॉ. विशाल चौगुले, डॉ .रवींद्र भोसले, डॉ. पृथ्वीराज पाटील, डॉ. रविकांत पाटील, डॉ.अमित जोशी, डॉ. रियाज मुजावर यांच्यासह मान्यवर व स्पंदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी व शिरोळ शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.