महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाचे 3 महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत, राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये किमान 1000 जलाशय जसे चेक डॅम, सार्वजनिक तलाव, नद्या यांच्यातील गाळ काढून त्यांची साठवण क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने, टाटा मोटर्स, नाम फाऊंडेशन आणि मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. यावेळी नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, टाटा मोटर्सचे पदाधिकारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मृद व जलसंधारण विभागाचे 3 सामंजस्य करार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने 3 महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केले. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत या करारांच्या माध्यमातून राज्यातील मृद व जलसंधारणासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.

सामंजस्य करारांचे तपशील पुढीलप्रमाणे :-

🔸 पहिला सामंजस्य करार : टाटा मोटर्स-नाम फाऊंडेशन आणि मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासन

✅ राज्यातील जलाशयांमध्ये साठलेला गाळ काढून त्यांचे खोलीकरण करून त्यांची साठवण क्षमता वाढविणे, त्या योगे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे, परिसरातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे या उ‌द्देशाने शासन ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ योजना राबवित आहे.
✅ या योजनेअंतर्गत राज्यातील 23 जिल्ह्यांमधील किमान 1000 जलाशय, जसे की चेक डॅम, सार्वजनिक तलाव, आणि नद्यांमधील गाळ काढून त्यांची जलसाठवण क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने हा सामंजस्य करार करण्यात आलेला आहे.
✅ नाम फाऊंडेशन सदर सामंजस्य करारांतर्गत प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारी संस्था असेल.
✅ टाटा मोटर्स या प्रकल्पाचे संपूर्ण व्यवस्थापन करणार असून, निवडलेल्या प्रत्येक जिल्ह्यात एका वॉटर फेलोची नियुक्ती त्यांच्या मार्फत केली जाणार आहे.
✅ या वॉटर फेलोच्या माध्यमातून सर्व संबंधित यंत्रणांमध्ये योग्य प्रकारे समन्वय साधला जाईल, तसेच प्रकल्प वेळेत पूर्ण होईल.

🔸 दुसरा सामंजस्य करार : भारतीय जैन संघटना आणि मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासन

✅ ग्रामपंचायतीकडून ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत मागणी जमा करणे, ती शासनापर्यंत पोहोचविणे, योजनेची प्रचार-प्रसिद्धी व एकूणच पाण्याच्या विषयावर राज्यात जनजागृती करणे यासाठी सदर सामंजस्य करार करण्यात आला.
✅भारतीय जैन संघटना राज्य व जिल्हा स्तरावर समन्वयकांची नियुक्ती करणार आहे.

🔸 तिसरा सामंजस्य करार : महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र, नागपूर (MRSAC) आणि मृद व