विवेकानंद मध्ये 4 व 5  फेब्रुवारी रोजी विवेकानंद महोत्सवाचे आयोजन

कोल्हापूर (पांडुरंग फिरींगे)

विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळवून  देण्यासाठी  विवेकानंद कॉलेजच्या  वतीने  दरवर्षी पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी विवेकानंद महोत्सव शोध चैतन्याचा  या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. गेली पाच वर्षे हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला असून या वर्षीचा उपक्रम दिनांक 4 व 5 फेब्रुवारी 2025 रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न होत आहे. 

 

 

या उपक्रमामध्ये पहिल्या दिवशी दि. 4 फेब्रुवारी रोजी अभिवाचन,  ॲड मॅड शो, आयडीयाथॉन, रील फ्लिक्स, डान्स मॅजिक या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रत्येक स्पर्धांसाठी प्रथम क्रमांकास रु.4000/- व्दितीय क्रमांकास  रु.3000/- तृतीय क्रमांकास रु.2000/-  व उत्तेजनार्थ क्रमांकास रु.1000/- अशी एकूण 70,000/- रुपयांची पारितोषिके विजेत्यांना मिळणार आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ अशा विविध राज्यातील स्पर्धक विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दि. 5 फेब्रुवारी रोजी फनफेअरच्या निमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठीविविध फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विवेकानंद कॉलेजमधील विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी मिस्टर ॲण्ड मिस विवेकानंद  या स्पर्धेचे आयोजन करणेत आले आहे.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साई बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सचे  मा. प्रकाश मेडशिंगे व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे उपस्थित राहणार आहेत. तर दुसऱ्या दिवशीच्या फनफेअरच्या उदघाटनासाठी  संस्थेचे सी.ई.ओ. मा. कौस्तुभ गावडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
तसेच मिस्टर ॲण्ड् मिस विवेकानंद या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुण्या म्हणून संस्थेच्या सेक्रेटरी मा.प्राचार्या शुभांगी गावडे व स्मार्टस ग्लोबल सर्व्हिसचे संचालक रोहित कोरगावे हे उपस्थित राहणार आहेत.

तरी या विवेकानंद महोत्सवातील स्पर्धांचा लाभ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, आय.क्यु.ए.सी व महोत्स्‍ावाच्या समन्वयक डॉ. श्रुती जोशी यांनी केले आहे.

🤙 9921334545