वाहतूक सुरक्षेसाठी प्रबोधनाची गरज: सत्यराज घुले

कोल्हापूर -:विद्यार्थ्यांनी वाहतूक सुरक्षेसाठी शाळा, गाव,कुटुंब यांचे प्रबोधन करावे.अपघात समयी जखमींना मदत करण्यासाठी महामार्ग मृत्युंजय दुत, महामार्ग पोलिस यांना मदत करून जखमीसाठी देवदूत बनावे असे प्रतिपादन उजळाईवाडी महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सपोनि सत्यराज घुले यांनी केले.

 

सरस्वती मंगल कार्यालय येथे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत वाहतूक सुरक्षा या विषयावर स्पर्धेतील विद्यार्थ्यांना, विना अपघात चालकांचा, महामार्ग मृत्युंजय दूत यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. माजी सभापती प्रदीप झांबरे अध्यक्षस्थानी होते.

२० वर्ष विना अपघात सेवा बजावलेले एस टी चालक सुनील खोत ( ढगेवाडी),रामचंद्र संकपाळ (कसबा वाळवे ),बाजीराव पाटील भांदोले),संजय बारपटे (विठ्ठलवाडी ) तर २७ वर्ष विना अपघात सेवा बजावलेले अविनाश उलपे (कसबा बावडा) ,जयकुमार माळगे (वडणगे), राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक नियंत्रण व महामार्ग अपघात मध्ये मदत कार्य करणारे महामार्ग मृत्युंजय दुत मोहन सातपुते, सागर जंगम, डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जयकुमार मोरे, अन्य मृत्युंजय दुत यांच्यासह माध्यमिक शाळा विद्यार्थी – विद्यार्थिनी, शिक्षक, मुख्याध्यापक यांचा प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास महामार्ग पोलिस मदत केंद्राचे स.पो.नि सत्यराज घुले, पोलिस उपनिरीक्षक सुनील माळगे, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप जाधव, पोलिस उपनिरीक्षक रविंद्र गायकवाड, करवीर पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप झांबरे, मुख्याध्यापक उत्तम गवळी,प्रा.अमर शितोळे सर, मोहन सातपुते , माजी सरपंच काका पाटील यांच्यासह, पोलिस कर्मचारी उपस्थित होते.प्रास्ताविक प्रा.अमर शितोळे यांनी,सूत्रसंचालन पल्लवी देसाई, आभार पोलिस उपनिरीक्षक सुनील माळगे यांनी मानले.