कोल्हापूर: येथील ओएसिस ऍग्रो इंडस्ट्रीजचा कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयतील सूक्ष्मजीवशास्त्र पदवीत्तर विभागाबरोबर पुढील पाच वर्षासाठी सामंजस्य करार झाला आहे.
या सामंजस्य कराराअंतर्गत पुढील पाच वर्षासाठी महाविद्यालयातील पदवीत्तर विद्यार्थ्यांसाठी विविध संयुक्त प्रोजेक्ट, प्रशिक्षण कार्यक्रम, वर्कशॉपचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना जैविक व पर्यावरण पूरक शेती कशी केली जाते याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच जैविक निविष्ठा उत्पादन याविषयी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ह्या प्रशिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांना चांगला होणार आहे. तसेच विषमुक्त व पर्यावरण पूरक शेती याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.
यावेळी ओएसिस अग्रो इंडस्ट्रीजचे डायरेक्टर कृषीतज्ञ प्रवीण माळी, कल्पना माळी, व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. टी. सी. गोपाले, डॉ. माळी, डॉ. भिसे, श्रीमती मिसाळ, श्री गबाळे , श्रीमती पिसे, श्रीमती नाडकर्णी, व श्रीमती शेख आदी उपस्थित होते.