राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी समाजाची नाळ जोडता येते – डॉ. टी. एम. चौगले

कोल्हापूर : विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना महत्त्वाची आहे.  राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी समाजाची नाळ जोडता येते. विद्यार्थी व ग्रामस्थांच्या सहकार्यातून गावामध्ये ग्राम सफाई, आरोग्य शिबीर, वृक्षसंवर्धन, एड्स जनजागृती, जलसाक्षरता, महिला सबलीकरण, पर्यावरण जागृती, सांडपाणी व्यवस्थापन, अंधश्रध्दा निर्मुलन असे अनेक चांगले उपक्रम राबवून गावाचा विकास साधता होतो. असे विचार मा. डॉ. टी. एम. चौगले, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी विवेकानंद महाविद्यालयाच्या मौजे वसगडे, ता.करवीर, जि. कोल्हापूर  येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी मांडले.

 

 

 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, एनएसएसच्या शिबिरातून विद्यार्थ्यांनी स्वतःचा शोध घ्यावा. विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन समाज सेवा करावी. एन.एस.एस.च्या माध्यमातून विद्यार्थीरुपी युवा शक्तींचा उपयोग समाजोपयोगी कामे करुन घेण्यासाठी करता येतो. या शिबीरासाठी श्री. हितेंद्र साळुंखे, रजिस्ट्रार श्री.आर.बी.जोग, श्री एस पी देसाई, श्री ई जी मंगल, श्री आर एम बोंगे, श्री सदानंद दुर्गुळे यांचे सहकार्य लाभले. या शिबीरास ज्युनिअर व सिनिअर कॉलेज मधील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी यांनी भेट दिली.

प्रा. पी.आर.बागडे, कार्यक्रम अधिकारी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. सुयश झुणके यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम अधिक प्रा. डॉ.जी.एस.उबाळे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. या कार्यक्रमास प्रा. एस. पी. थोरात, कार्यक्रम अधिकारी प्रा.संदीप पाटील, प्रा राजश्री पाटील, डॉ. बी टी दांगट, डॉ.संपदा टिपकुर्ले, प्रा सौ. सी. सी. पाटील प्रा. सौ. नयना पाटील तसेच ग्रामस्थ व सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.