विवेकानंद  कॉलेज  मध्ये  बायोटेकनॉलॉजी विभागाचे SYNCHROME 2025  उत्साहात

कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेजच्या बायोटेक्नॉलॉजी (एंटायर) विभागातर्फे बी.एस्सी. भाग 1, 2 व 3 या तिन्ही वर्गातील विद्यार्थ्यांसाठी SYNCHROME 2025 हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

 

 

कार्यक्रमाचे उदघाटन कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले.  एम.बी.ए.चे समन्वयक प्रा.विराज जाधव यांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमामध्ये प्रा.विराज जाधव यांनी बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना एम.बी.ए. बायोटेक्नॉलॉजी व भविष्यात उपलब्ध नोकरीच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार व प्रा.विराज जाधव यांच्या हस्ते उत्कृष्ठ हजेरी, खेळाडू, एन.सी.सी. कॅडेट, शिष्यवृतीप्राप्त्‍ विद्यार्थी, विवेक नियतकालिकात लेखन करणारे, यावर्षीचा सर्वोत्कृष्ठ विद्यार्थी इत्यादी पुरस्कार बायोटेक्नॉलॉजी विभागातर्फे देण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा.एस.जी.कुलकर्णी यांनी केले. तर आभार प्रा. विनया मोरे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी रजिस्ट्रार श्री.आर.बी.जोग व प्राध्यापक, प्रशासकीय सेवकांचे सहकार्य लाभले.  या प्रसंगी  विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.

🤙 9921334545