दोन्ही उपमुख्यमंत्रींच्या उपस्थितीत न्यायमूर्ती आलोक आराधे यांचा शपथविधी

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे ४८ वे न्यायमूर्ती म्हणून आलोक आराधे यांचा शपथविधी सोहळा राजभवन येथे संपन्न झाला. यावेळी राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थितीत होते.

 

 

 

तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती असलेले आलोक आराधे यांची केंद्र शासनाने राज्याचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून निवड केली आहे. ही निवड ते निश्चितच सार्थ ठरवतील आणि रामशास्त्री बाण्याने सर्वांना समन्यायी वागणूक देतील असा विश्वास याप्रसंगी एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला. आराधे यांनी तेलंगणा, मध्य प्रदेश तसेच जम्मू आणि काश्मीर येथे केलेल्या कामाचा आलेख पाहता ते मुंबई उच्च न्यायालयाची देदीप्यमान परंपरा उन्नत राखतील अशा शुभेच्छा यावेळी त्यांना दिल्या.

यावेळी मुंबई उच्च न्यायालयातील इतर ज्येष्ठ न्यायाधीश तसेच मुंबई उच्च न्यायालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.