कुंभोज (विनोद शिंगे)
इचलकरंजी येथे हिरा-शाम एज्यु. सोसायटीमार्फत बांधकाम कामगार कार्यालय आणि कै. लक्ष्मण पोवार यांच्या स्मरणार्थ वाचनालयाचे उद्घाटन माजी मंत्री मा.आमदार प्रकाशआण्णा आवाडे आणि आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने संपन्न झाले.
“शिक्षण आणि श्रमिक कल्याण ही समाजाच्या प्रगतीची महत्त्वाची साधने आहेत. बांधकाम कामगारांसाठी हे कार्यालय त्यांना त्यांच्या हक्कांसाठी आधार ठरेल, तर वाचनालय नव्या पिढीला ज्ञानाच्या वाटेवर प्रवास करण्यासाठी प्रेरित करेल.”
यावेळी भाजपा शहराध्यक्ष अमृत भोसले, भाऊसो आवळे, रवी जावळे, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, राजू बोंद्रे, मोहन काळे, संजय केंगार, जयेश बुगड, लक्ष्मण तोडकर, जयसिंग पाटील, शरद करबे, रमेश साळुंखे, हुलगप्पा वडर, अक्काताई आवळे, दुर्वंती दळवाई, उर्मिला गायकवाड, अरुणा शहा, अर्चना कुडचे, मेगा भाटले, रमेश पाटील, अनिल चांदणे, अरुण निंबाळकर, संजय मोहिते, बाबासाहेब पाटील, चंद्रकांत कोष्टी, नरसिंह पारिख, महावीर कुरुंदवाडे, चंद्रकांत पाटील, रवी मीणेकर, प्रथमेश पोवार उपस्थित होते.