विद्यापीठात जागतिक हिंदी दिवस व आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा उत्साहात

कोल्हापूर: ‘आम्ही भारताचे लोक’ या उक्तीप्रमाणे प्रत्येक नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेऊऩ देशासाठी निस्वार्थ सेवाभाव जपला पाहिजे. ज्यावेळी आपत्ती व्यवस्थापनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात जावे लागते, त्यावेळी हिंदी भाषेचाच आधार घ्यावा लागतो, असे प्रतिपादन व्हाईट आर्मीचे संस्थापक अध्यक्ष अशोक रोकडे यांनी आज येथे केले.

 

 

शिवाजी विद्यापीठाचे हिंदी व पर्यावरण शास्त्र अधिविभाग, शिव सहाय्यता व आपत्ती व्यवस्थापन केंद्र आणि यूको बॅंक यांच्या वतीने जागतिक हिंदी दिवसानिमित्त निलांबरी सभागृहात आज व्याख्यानमाला व आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा झाली. यावेळी श्री. रोकडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील होते.

यावेळी आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे समन्वय डॉ. एस. एम. गायकवाड, राजभाषा अधिकारी अमरदीप कुलश्रेष्ठ यांनी विचार व्यक्त केले. शाखा अधिकारी विशाल गीते उपस्थित होते. हिंदी अधिविभाग प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. संतोष कोळेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. पर्यावरणशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. आसावरी जाधव यांनी आभार मानले. डॉ. गीता दोडमणी, डॉ. अक्षय भोसले यांनी सूत्रसंचालन केले.

दुसऱ्या सत्रात डॉ. पल्लवी कुलकर्णी, डॉ. प्रदीप भिंगार्डे, डॉ. विनायक माळी यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. आग सुरक्षा अधिकारी दस्तगीर मुल्ला यांनी प्रात्यक्षिक दाखविले. या निमित्ताने विद्यापीठाच्या रेडिओ शिववाणीवरून हिंदी दिवसाचे महत्त्व सांगणारा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. कार्यक्रमात वारणा महाविद्यालयाचे डॉ. प्रकाश चिकुर्डेकर, अधिसभा सदस्य अभिषेक मिठारी, डॉ. पल्लवी भोसले, प्रा. अनिल मकर, डॉ. रचना इंगवले, डॉ. सुषमा चौगले, डॉ. सुवर्णा गावडे, डॉ. प्रकाश मुंज यांच्यासह विद्यार्थी सहभागी झाले.

विद्यार्थ्यांना पारितोषिके वितरण

आजच्या कार्यक्रमात अश्विनी पाटील, सिद्धेश्वर माळी यांना राजभाषा सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील पुरस्कार प्राप्त विद्यार्थी पुढीलप्रमाणे:

पदवीस्तर- वैष्णवी कांबळे, इरम खान, जान्हवी ओंबळे, वैष्णवी चव्हाण, मोहम्मद अत्तार.

पदव्युत्तर- अविनाश कांबळे, श्रीकांत देसाई, गुलामगौस तांबोळी, आदित्य सोनवणे, बन्सी होवाळे.

🤙 9921334545