मंत्री हसन मुश्रीफांचा कडगाव – कौलगे जिल्हा परिषद मतदार संघाच्या वतीने भव्य नागरी सत्कार

कोल्हापूर : गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथे आयोजित कडगाव – कौलगे जिल्हा परिषद मतदार संघाच्या वतीने मंत्री हसन मुश्रीफ यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ पार पडला.

 

कागल विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत सात हजार कोटीची विकास कामे केली आहेत. उर्वरित विकासकामे करण्याचे नियोजन केल्याचे सांगितले, लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेच्या निवडणुका होणार असल्याचे सांगत लाडक्या बहिणींना महिन्याला २१०০ रुपये मिळायला, सुरुवात या निवडणुकीपूर्वी होईल असे स्पष्ट केले. महायुती सरकारने सुरू केलेली कुठलीही योजना बंद होणार नसून आगामी सर्व निवडणुकीतही जनता महायुतीलाच साथ देईल, असा विश्वास मुश्रीफांनी व्यक्त केला.

यावेळी गडहिंग्लजचे माजी नगराध्यक्ष राजू खनगावे, माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र भद्रापूर व करंबळीचे लोकनियुक्त सरपंच अनुप पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देऊन सत्कार केला.

यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील – गिजवणेकर, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती संग्रामसिंह कुपेकर, केडीसीसी बँकेचे संचालक संतोष पाटील, गिजवणेच्या सरपंच पौर्णिमा कांबळे, उपसरपंच आदित्य पाटील, नितीन पाटील, शिल्पा पाटील, रमेश पाटील, अशोक खोत, रंजना चव्हाण, के बी पवार, भूषण गायकवाड, अमित देसाई, गोड साखरचे संचालक बाळासाहेब मंचेकर, सदानंद पाटील, बंटी पाटील, पृथ्वीराज पाटील, सचिन देसाई, महावीर पाटील, शारदा आजरी, डॉ. बेनिता डायस, शीलाताई जाधव, यांच्यासह कडगाव – कौलगे जिल्हा परिषद मतदार संघातील प्रमुख कार्यकर्ते व गिजवणे येथील विविध संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर माता – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706