मुंबई : महाराष्ट्र सातत्याने परकीय गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यात अग्रेसर आहे.आता 2024-25 या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसर्या तिमाहीची आकडेवारी आली आहे. त्यात अवघ्या सहा महिन्यात 1 लाख 13 हजार 236 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे.
गेल्या 4 वर्षांतील सरासरी पाहिली तर 1,19,556 कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या 94.71 टक्के गुंतवणूक ही फक्त 6 महिन्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड अशीच कायम राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली .
2020-21 : 1,19,734 कोटी
2021-22 : 1,14,964 कोटी
2022-23 : 1,18,422 कोटी
2023-24 : 1,25,101 कोटी
2024-25 (एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यात) : 1,13,236 कोटी