कोल्हापूर: दत्तवाड ग्रामीण रुग्णालय इमारतीसाठी १६ कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी मिळाली आहे,जुने रुग्णालय निर्लेखन करण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे,लवकरच निर्लेखनाचे काम सुरू होणार आहे, त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयाचे इतर जागेत तातडीने स्थलांतर करून मंजूर झालेल्या निधीतून सुसज्ज इमारतीच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी,या सर्व कामात रुग्णांना देण्यात येणारी सेवा अखंडित ठेवून रुग्णांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी,अशा सूचना आ. राजेंद्र यड्रावकर यांनी दिल्या.
दत्तवाड ग्रामीण रुग्णालयासाठी १६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ७२ गुंठे इतक्या जागेमध्ये ३० खाटांचे हे सुरुज्ज रुग्णालय उभे राहणार आहे. या रुग्णालयात अत्याधुनिक सेवा सुविधा देखील पुरवल्या जाणार आहेत.दत्तवाडसह परिसरातील ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हे रुग्णालय नेहमीच आरोग्यमंदीर ठरले आहे.या भागातील रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सेवेचा लाभ मिळावा,या हेतूने या ग्रामीण रुग्णालयाला मोठा निधी मंजूर केला आहे.त्याचबरोबर रुग्णालयाचे स्थलांतर ग्रामपंचायतीने उपलब्ध केलेल्या इमारतीत होणार असल्याने त्या ठिकाणी सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी १५ लाख रुपयांच्या खर्चाची तरतूद केल्याने याचेही काम पूर्णत्वास आले आहे.लवकरच या ठिकाणी सदरचे रुग्णालय स्थलांतर होणार आहे.
दरम्यान आज ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली.यावेळी वैद्यकीय अधिकारी तसेच शासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या.जुन्या इमारतीच्या निर्लेखनाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून तातडीने कामाला सुरुवात होणार आहे.त्यामुळे सध्या रुग्णालय तात्पुरते इतर ठिकाणी विस्थापित करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, व नवीन सुसज्ज इमारतीच्या कामाला लवकरच सुरुवात करावी,या सर्व कामात रुग्णांना देण्यात येणारी कोणतीही सेवा खंडित करण्यात येऊ नये,अशा सूचना यावेळी दिल्या.
यावेळी वैद्यकीय अधिकारी स्नेहल व्हटकर,डॉ.प्रदीप पुजारी,रिजवान पटेल,सुभाष राणे,डॉ.इरफान नदाफ यांच्यासह सरपंच चंद्रकांत कांबळे, डी.एन सिदनाळे,अभय चौगुले,नूर काले,लाला मांजरेकर,बसगोंडा तोडकर,कलापा कडाके,अकबर काले, नटराज माळगे आदी उपस्थित होते.