कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे)
आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या ५६,८११ मताधिक्य च्या विजयाच्या आधारावर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रासह परिसरात वृक्षलागवडीचा संकल्प केला होता. या संकल्पाच्या अनुषंगाने श्री राम मंदिर, शिवाजी नगर, कोरोची येथील परिसरात वृक्षलागवडीची सुरुवात केली.


या मोहिमेचा उद्देश पर्यावरणाचा रक्षण आणि भविष्यातील पीढींसाठी शुद्ध व निरोगी वातावरण निर्माण करणे आहे. आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली या वृक्षलागवड मोहीमेत स्थानिक नागरिक, समाजसेवी, विद्यार्थ्यांसह विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले.
आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी वृक्षलागवडीच्या सुरुवातीला या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट करत पर्यावरण संरक्षणाचे आवाहन केले आणि सर्वांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे सांगितले.
वृक्षारोपणाच्या माध्यमातून इचलकरंजीच्या पर्यावरणीय परिस्थितीला सुधारण्याचा आणि भविष्यात हिरवाईच्या वाढीला चालना देण्याचा संदेश दिला आहे.
