कोल्हापूर :देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने एक महान अर्थतज्ञ विकासाभिमुख राजकीय व्यक्तिमत्व, आणि लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे.


त्याच्या स्मृतीला आदरांजली अर्पण करण्यासाठी इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात येणार असून यासाठी 3 जानेवारी रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये सकाळी 10.00 वाजता शोकसभेचे आयोजन केले आहे. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते सहभागी होऊन डॉ. मनमोहन सिंग यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणार आहेत.
इंडिया आघाडी व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते, हितचिंतक यांनी या शोकसभेस उपस्थित रहावे असे आवाहन इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या वतीने विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केले आहे.
