कुंभोज ( विनोद शिंगे)
कुंभोज तालुका हातकणंगले येथील छत्रपती शिवाजी नगर वसाहतीमध्ये जलजीवन मिशन योजना पाणी पुरवठाची बांधकाम कार्यकाल संपूनही, अजूनही हि योजना अपूर्णच आहे .


हे काम तात्काळ मार्गी लावावे अशी मागणी शिवाजी नगर परिसरातील ग्रामस्थातून सध्या जोर धरत आहे. कुंभोज येथे बाहुबली रस्त्यालगत छत्रपती शिवाजी नगर वसाहत आहे .वसाहतीमध्ये गाव योजनेतून पिण्याचा पाण्याचा पुरवठा होतो. गावातून पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीचे अंतर शिवाजी नगर पासून दोन ते तीन किलो मिटर असल्याने शिवाजी नगर परिसरात अत्यंत कमी दाबाने परिसराला पाणीपुरवठा केला जातो.
त्यामुळे सदर शिवाजीनगर परिसरासाठी स्वतंत्र जलजीवन योजना राबविण्यात आली. सदर योजनेसाठी 1 कोटी 80 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. सदर कामाच्या मुख्य ठेकेदांरानी पोट ठेकेदाराची नेमणूक केली आहे. ठेकेदाराना तीन वेळा मासिक बैठकीला बोलावले मात्र तो आला नाही त्यांने गावातील वरिष्ठांची कधीही त्यांनी भेट घेतली नाही .असे मत महाविकास आघाडीचे गटनेते किरण मळी यांनी बोलताना व्यक्त केले आहे. परिणामी सदर कामाचे अध्याप 15% पाईपलाईनचे काम करणे बाकी आहे. यामध्ये बाहुबली वसाहत वड्यावरील कामाचा समावेश असल्याचे मत पोट ठेकेदार शितल हेरले यांनी सांगितले.
दोन लाख लिटर क्षमतेचे पाणी संकलन टाकी असलेल्या या कामाचा शुभारंभ 25 जुलै 2024 रोजी झाला होता. सदर कमाला सुरुवात होऊन एक वर्ष उलटले तरी अजून सदर जल जीवन योजनेचे काम अपूर्ण असल्याने नागरिकातून संताप व्यक्त होत आहे.
