इचलकरंजीच्या पुरवठा कार्यालयातील कामातील अनागोंदी; राहुल आवाडेंनी अचानक दिली भेट

कोल्हापूर : चालढकलपणा आणि प्रलंबित कामांवर आमदार राहुल आवाडे यांनी सकाळी अचानक भेट देत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. येत्या चार दिवसांत प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा इशारा देत त्यांनी सोमवारी पुन्हा आढावा बैठक घेणार असल्याचे जाहीर केले.

नागरिकांच्या रेशनकार्डसंदर्भातील तक्रारी, बारा अंकी क्रमांकांसाठी प्रलंबित अर्ज, तसेच रेशनधान्यासाठी कोठ्याच्या अभावामुळे निर्माण झालेली अडचण यांबाबत राहुल आवाडे यांच्याकडे वारंवार तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमीवर त्यांनी अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने, पुरवठा अधिकारी दिनेश आडे आणि कार्यालयातील कर्मचारी यांच्या समवेत तातडीची बैठक घेत कठोर सूचना दिल्या.

या बैठकीस तहसीलदार, पुरवठा अधिकारी, पदाधिकारी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

🤙 8080365706