‘एमबीबीएस’चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार ; खा. सुप्रिया सुळेंचे विद्यार्थ्यांना आश्वासन

मुंबई : खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘एमबीबीएस’चे शिक्षण घेणाऱ्या सन २०२१-२२ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी भेट घेतली. ऐन कोरोना काळात या मुलांना या अभ्यासक्रमास प्रवेश मिळाला. परंतु या काळात सर्व काही ठप्प असल्याने त्यांना आणखी एक संधी मिळावी अशी त्यांची मागणी आहे.

 

यापुर्वी २०२० च्या बॅचबाबत हा निर्णय घेतला गेला आहे. यावेळी सुळेंनी या विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांना दिले. याप्रसंगी विविध राज्यातील विद्यार्थ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर उपस्थित होत्या.

🤙 8080365706