मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील १०० दिवसांत करावयाच्या कामाच्या अनुषंगाने आढावा घेतला

मुंबई:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह्याद्री अतिथिगृह येथे पुढील १०० दिवसांत करावयाच्या कामाच्या अनुषंगाने आढावा घेतला. यामध्ये त्यांनी परिवहन, सांस्कृतिक कार्य, ग्रामविकास, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि वस्त्रोद्योग विभागांना उपयुक्त सूचना दिल्या.

 

 

परिवहन विभाग
•⁠ ⁠जुन्या वाहनांचे स्क्रॅपिंग व नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण राबविणे
•⁠ ⁠रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) चा वापर करणे.
•⁠ ⁠घाट रस्त्यांसाठी विशेष अभियांत्रिकी उपाययोजन्यात यावे
•⁠ ⁠परिवहन सेवेला गती देण्यासाठी बाईक टॅक्सी, मॅक्सी कॅब सेवा सुरू करणे.

सांस्कृतिक कार्य विभाग
•⁠ ⁠चित्रीकरणासाठी ऑनलाईन ‘एक खिडकी’ परवानगी देण्यात यावी
•⁠ ⁠पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त व्यावसायिक चित्रपट निर्मिती करणे.
•⁠ ⁠‘हर घर संविधान’ मोहिमेदवारे प्रत्येक घरात संविधान पोहोचविणे.

ग्रामविकास व पंचायतराज विभाग
•⁠ ⁠१३ लाख घरकुलांसाठी ४५० कोटींचा पहिला हप्ता लवकरच वितरित करणे.
•⁠ ⁠ग्रामीण रस्ते दर्जेदार सिमेंट काँक्रीटचे करणे.
•⁠ ⁠महाआवास अभियानाअंतर्गत प्रत्येक घर हे सौर ऊर्जेवर करणे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
•⁠ ⁠स्थलांतरित मजुरांसाठी स्मार्ट रेशनकार्ड करणे
•⁠ ⁠ई-केवायसी प्रमाणीकरण करणे.
•⁠ ⁠‘एक गाव एक गोदाम’‍ आणि ‘एक देश, एक शिधापत्रिका’ धोरण राबविणे

सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग
•⁠ ⁠महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळाची स्थापना करणे
•⁠ ⁠स्थानिक वस्त्रोद्योगासाठी कॅप्टिव्ह मार्केट योजना प्रभावीपणे लागू करणे
•⁠ ⁠हातमाग विणकरांना निवृत्ती वेतन योजनेद्वारे सामाजिक सुरक्षा कवच प्रदान करणे

🤙 8080365706