शिवाजी विद्यापीठातील गणित अधिविभागात राष्ट्रीय गणित दिन उत्साहात

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील गणित अिधिविभागाने राष्ट्रीय गणित दिनानिमित्त विविध गणितीय उपक्रम आयोजित करून त्यामध्ये विद्यापीठासह महाविद्यालय तसेच शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांना सामावून घेऊन खऱ्या अर्थाने गणिताची लोकप्रियता वाढवण्याचे प्रयत्न केले.

या उपक्रमांना उत्तम प्रतिसादही लाभला. विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या अधिष्ठाता तथा गणित अधिविभागाप्रमुख प्रा. डॉ. सरिता ठकार यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम यशस्वीरित्या पार पडले. भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत असणारे राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान संप्रेषण मंडळ (एन.सी.एस.टी.सी.) आणि राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोग, मुंबई यांच्या अर्थसहाय्याने शिवाजी विद्यापीठाच्या गणित अधिविभागाने राष्ट्रीय गणित दिनानिमित्त दि. 22 व दि.23 डिसेंबर 2024 रोजी विविध कार्यक्रमांचेआयोजन केले .

दि. 22 डिसेंबर 2024 रोजी डॉ. दिपक शेटे (संग्राहक व गणित अभ्यासक) यांच्या
“जीवनाचे गणित“ या विषयावरील व्याख्यानाने राष्ट्रीय गणित दिनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच गणितात रुची असणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसाठी भित्तीपत्रक व प्रतिकृतीस्पर्धेचे आयोजन करण्यात आले. भित्तीपत्रक स्पर्धेत 9 शाळांमधील 20 विद्यार्थ्यांनी तसेच प्रतिकृती स्पर्धेत 6 शाळांमधील 13 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. गणित अधिविभागातील विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धेमध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला . दि. 23 डिसेंबर 2024 रोजी नॅनो सायन्स अधिविभागातील डॉ. पी. जे. पाटील यांचे Thomae’s function and an application of Nested interval theorem या विषयावरती व्याख्यान
झाले. तसेच शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत पदवी व पदव्युत्तर स्तरावरील
गणिताच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा, निबंध आणि सेमिनार स्पर्धांचे आयोजन करण्यात
आले.भित्तीपत्रक स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूल, कोल्हापूर व श्री नागेश्वर हायस्कूल, राशिवडे- बुद्रुक आणि प्रतिकृती स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूल, कोल्हापूर व प्रायव्हेट हायस्कूल, कोल्हापूर यांनी अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची पारितोषिके मिळवली. निबंध स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर प्रथम तर कस्तुरबा वालचंद महाविद्यालय, सांगली हे द्वितीय क्रमांकाने विजयी झाले. तसेच सेमीनार स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर यांनी प्रथम तर राजाराम कॉलेज, कोल्हापूर यांनी द्वितीयक्रमांक पटकावला. प्रश्नमंजुषा स्पर्धेत डॉ. घाळी कॉलेज, गडहिंग्लज प्रथम तर यशवंतराव चव्हाण कॉलेज, ऑफ सायन्स कराड हे द्वितीय क्रमांकाचे मानकरीत ठरले. या कार्यक्रमासाठी गणिताचे निवृत्त प्रा. डॉ. एम. एस. चौधरी, गणित अधिविभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. सरिता ठकार, डॉ. के. डी. कुच्चे, शिक्षणशास्त्रअधिविभागाचे डॉ. व्ही. एस. खंडागळे, नॅनो सायन्स अधिविभागाचे डॉ. पी. जे. पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
राष्ट्रीय गणित दिनाच्या औचित्याने दि. 30 डिसेंबर 2024 रोजी गणित अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे इयत्ता आठवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांना गणित विषय शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी गणिताच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. याप्रशिक्षणासाठी श्री. नागेश मोने (वाई) व श्री. अरविंद रायरीकर (पुणे) यांना प्रशिक्षक म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.
हे सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी गणित अधिविभागातील शिक्षक व
शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .

🤙 9921334545