मुंबई : कै. संतोष देशमुख यांच्या हत्येतील वाल्मिक कराड सह गुन्हेगारांना अटक करावी, यासाठी सर्वपक्षीयांच्या वतीने बीड जिल्ह्यात मोर्चा व सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती संभाजीराजे हे उपस्थित राहून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने भूमिका मांडली.
कै. संतोष देशमुख यांची हत्या होवून १९ दिवस उलटले परंतु अद्यापही गुन्ह्यातील प्रमुख मास्टरमाइंड वाल्मिक कराड व सुदर्शन घुलेला अटक करण्यात आलेली नाही. तसेच त्यांचे आश्रयदाते असणाऱ्या धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाची बक्षिसी दिलेली आहे.
या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन कै. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना पदावरून मुक्त करावे, तसेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद धनंजय मुंडेला देवू नये, अशी मागणी यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी केली.