कबनूर मधील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी बैठक

कोल्हापूर : आमदार राहुल आवाडे यांनी कबनूर गावातील वाहतुकीची कोंडी ही स्थानिक नागरिकांसाठी गंभीर समस्या बनली असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली.

 

ही बैठक पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील व वाहतूक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

वाहतूक समस्या व उपायांचा आढावा गावातील वाहतूक कोंडीचे कारण समजून घेण्यासाठी आणि त्यावर त्वरित उपाययोजना आखण्यासाठी सविस्तर चर्चा झाली. याप्रसंगी नागरिकांच्या सहकार्याने या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन राहुल आवाडे यांनी दिले.

बैठकीस कबनूरचे सरपंच, उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, आणि गावातील प्रमुख पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

🤙 9921334545