मंत्री चंद्रकांत पाटील यांचा भाजपा कोल्हापूरच्या वतीने भव्य नागरी सत्कार

कोल्हापूर: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी महायुती सरकारमध्ये शपथ घेतल्यानंतर प्रथमच कोल्हापूर येथे आले होते . यानिमित्त भाजपा कोल्हापूरच्या वतीने दादांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी खासदार दगंज महाडिक यांनी स्वागत केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ही एक ऐतिहासिक निवडणूक ठरली आहे. गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने जनकल्याणाच्या योजना राबवल्या आहेत. या सर्व योजना लोकांपर्यंत पोहचल्या आहेत. त्यामुळे महायुती सरकारला अभूतपूर्व यश मिळाले आहे. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना येत्या पाच वर्षांमध्ये राबवल्या जाणार आहेत.

चंद्रकांत दादा पूर्ण राज्यभर कार्य करतात. दादांकडे कोणतेही जिल्ह्याचे पालकमंत्री पद असले तरी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकत्व म्हणून दादांनी नेहमीच जबाबदारी पार पाडली आहेत. आगामी काळात देखील कोल्हापूरच्या विकासासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याला अधिक निधी प्राप्त होईल, असा विश्वास आहे.असे मत धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले.

यावेळी सुरेश हाळवणकर, भरमुअण्णा पाटील विजय जाधव, नाथाजी पाटील, महेश जाधव, राहुल चिकोडे, . राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545