कोल्हापूर: गोकुळ दूध संघाच्या वतीने दूध उत्पादन वाढीसाठी व उत्पादकांना प्रोत्साहन देणेसाठी प्रत्येक वर्षी गायी व म्हैशी करीता ‘गोकुळश्री’ स्पर्धा घेणेत येते, सन २०२४-२५ मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये एकूण ९३ म्हैस व गाय दूध उत्पादकांनी उत्साहाने भाग घेतल्याने स्पर्धेत चुरस निर्माण झाली होती.
सदरची स्पर्धा दिनांक २९/११/२०२४ इ.रोजी घेण्यात आली असून, त्यामध्ये श्री जोतिर्लिंग सह. दूध व्याव. संस्था लिंगनूर क ।। नूल ता. गडहिंग्लज या संस्थेचे म्हैस दूध उत्पादक श्री.शुभम कृष्णा मोरे यांच्या मुऱ्हा जातीच्या म्हैशीने एका दिवसात सकाळ व सांयकाळ पाळीमध्ये एकूण १९ लिटर ७३० मि.ली. इतके दूध देवून प्रथम क्रमांक मिळवला तर गायीमध्ये श्री जनसेवा सह. दूध व्याव. संस्था दुधगंगानगर, कसबा सांगाव ता.कागल या संस्थेचे गाय दूध उत्पादक श्री.संकेत किरण चौगले यांच्या एच.एफ जातीच्या गायीने सकाळ व सांयकाळ पाळीमध्ये एकूण ४२ लिटर ३०५ मि.ली. दूध देवून प्रथम क्रमांक मिळवला.
गोकुळशी संलग्न असणा-या सर्व प्राथमिक दूध संस्थांच्या सभासदांकरीता या स्पर्धा प्रतिवर्षी घेण्यात येतात. ‘गोकुळ श्री’स्पर्धेचा प्रमुख उद्देश दूध उत्पादकांना प्रोत्साहन देणे, जातिवंत जनावरे खरेदी करणे, जनावरांचे संगोपन सुधारणे, जनावरांमध्ये दूध उत्पादन वाढवणे याचबरोबर दुग्ध व्यवसायामधुन दूध उत्पादकांना जास्तीत-जास्त लाभ करून देणे तसेच तरूण पिढीला या व्यवसायकडे आकर्षित करून दूध व्यवसाय वाढविणे हा आहे. गोकुळने ही स्पर्धा गेल्या ३१ वर्षापासून आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सुरू केलेली आहे.
स्पर्धेमध्ये १ ते ३ क्रमांक असलेले म्हैस व गाय उत्पादक स्पर्धेचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे-
सन २०२४-२५ मधील म्हैस गटातील विजेते दूध उत्पादक | ||||||||
अ.नं | संस्थेचे नाव | गाव | तालुका | स्पर्धकाचे नाव | दिवसाचे दूध लि.मिली | जनावर जात
|
क्रमांक | बक्षीस रक्कम |
१. | श्री जोतिर्लिंग | लिंगनूर क || नूल | गडहिंग्लज | श्री.शुभम कृष्णा मोरे | १९ लिटर ७३० मि.ली. | मुऱ्हा | प्रथम | ३५,००० |
२. | श्री महालक्ष्मी | दुंडगे | गडहिंग्लज | श्री.किरण बाबू सावंत | १७ लिटर १८० मि.ली. | जाफराबादी | द्वितीय | ३०,००० |
३. | श्री लक्ष्मी | गडहिंग्लज | गडहिंग्लज | सौ.वंदना संजय जरळी | १६ लिटर ४८० मी.ली. | जाफराबादी | तृतीय | २५,००० |
सन २०२४-२५ मधील गाय गटातील विजेते दूध उत्पादक | ||||||||
अ.नं | संस्थेचे नाव | गाव | तालुका | स्पर्धकाचे नाव | दिवसाचे दूध लि.मिली | जनावर जात
|
क्रमांक | बक्षीस रक्कम |
१. | श्री जनसेवा दुधगंगा नगर | सांगाव | कागल | श्री.संकेत किरण चौगले | ४२ लिटर ३०५ मि.ली. | एच.एफ. | प्रथम | २५,००० |
२. | मा.आम.कै. किसनराव मोरे | सरवडे | राधानगरी | श्री.शांताराम आनंदा साठे | ३१ लिटर ५५०मि.ली. | एच.एफ. | द्वितीय | २०,००० |
३. | शाहू | वडणगे | करवीर | श्री.इबादुल्ला लुकमान मुल्ला | ३१ लिटर ३४० मि.ली. | एच. एफ. | तृतीय | १५,००० |
या स्पर्धा अत्यंत निकोप व व्यवस्थीत पार पाडण्यासाठी गोकुळच्या दूध संकलन विभागामार्फत स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असते. यासाठी स्थानिक गांव पातळीवरील प्राथमिक दूध संस्थेतील संचालकांचेही सहकार्य घेतले जाते. या स्पर्धेमुळे दूध उत्पादन वाढीबरोबरच गुणवत्तेमध्ये सुधारणा होण्यास मदत झाल्याचे दिसून आले आहे. तसेच या स्पर्धेमध्ये भाग घेणारे सर्व दूध उत्पादक व ज्यांनी प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेले दूध उत्पादक अभिनंदनास पात्र असून पुढील वर्षी जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी ‘गोकुळश्री’स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले आहे. दूध उत्पादकांचा या स्पर्धेतील वाढता सहभाग पाहता गोकुळच्या कार्यक्षेत्रातील दूध उत्पादक आपल्या जनावरांतील उत्पादन क्षमता वाढीसाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येते असे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी यावेळी नमूद केले. तसेच यावर्षीपासून म्हैस दूध वाढीसाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून एकूण बक्षीस रक्कमेत १५ हजार ने वाढ करणेत आली आहे.