कोल्हापूर : उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या परिपत्रकानुसार विद्यापीठे, महाविद्यालये व सार्वजनिक ग्रंथालयामध्ये ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्रोत केंद्र शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्याद्वारे दि.३० व३१ डिसेंबर २०२४ रोजी ‘ग्रंथप्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे.
सदर ग्रंथप्रदर्शन बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्रोत केंद्रामध्ये भरविण्यात येणार आहे. ग्रंथप्रदर्शनाचेउद्घाटन दि. ३० डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता मा. कुलगुरू डॉ. डी. टी.शिर्के यांच्या हस्ते तसेच मा. प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन.शिंदे व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. ग्रंथ प्रदर्शनाची वेळ सकाळी १०.३० ते सायं ६ पर्यंत असणार आहे.
तसेच यानिमित्ताने दि.३० डिसेंबर२०२४ ते १५ जानेवारी २०२५ पर्यंत ज्ञान स्रोत केंद्राच्या दुर्मिळ ग्रंथ विभागामध्ये दुर्मिळ ग्रंथाचे प्रदर्शन सर्वांना खुले असेल. वाचन संकल्प महाराष्ट्राचा साजरा करण्याच्या दृष्टिने दि.१ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत सर्व वाचकांना व नागरिकांना बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्रोत केंद्रातील वाचन साहित्य विनामुल्य वाचनाकरिता उपलब्ध असेल तसेच दि.१६ जानेवारी रोजी दीक्षांत समारंभाचे औचित्य साधून ग्रंथप्रदर्शन व विक्री तसेच १७ जानेवारी २०२५ रोजी ग्रंथदिंडी आयोजित केलेली आहे. सर्वांनी यामध्ये सहभागी होऊन वाचनसंस्कृती वृदि्धंगत करावी व वाचन पंधरवद्यातील सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. धनंजय सुतार, प्र.संचालक बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्रोत केंद्र यांनी केले आहे.