मालवे येथील रोहित पाटील यांची इस्रो ‘मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड

कोल्हापूर : मालवे (ता. राधानगी)येथील रोहित पाटील यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या ‘इस्रो’ या संस्थेमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. ही निवड कोल्हापूरकरांसाठी अभिमानास्पद आहे.

 

अपरिमित कष्ट आणि निष्ठा यांच्या बळावर अशक्य वाटणारी स्वप्नेही प्रत्यक्षात आणता येतात हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. देशाच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या इस्त्रो मध्ये निवड होणे ही खरोखरच गौरवास्पद आहे. त्यांच्या या दैदिप्यमान यशाने फक्त मालवे गावचेच नाही, तर कोल्हापूरच्या मातीचेही नाव देशभरात झाले आहे.

🤙 9921334545