पुणे : संपूर्ण देशभरात भारतीय जनता पार्टीची सदस्यता नोंदणी अभियान सुरू आहे. पुणे शहर भाजपा सदस्य नोंदणी अभियानाची जबाबदारी पक्ष नेतृत्वाने खासदार धनंजय महाडिक यांच्यावर सोपवली आहे. त्या अनुषंगाने पुणे भाजपा शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
या सदस्यता नोंदणी अभियानांतर्गत पुढील चार दिवसांमध्ये प्रत्येक मंडलात बैठक व कार्यशाळा घेऊन प्रत्येक बूथ वरती किमान 200 सदस्यांची नोंदणी करावी, याबाबत आवश्यक सूचना दिल्या. 5 जानेवारीपर्यंत प्रभागातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ‘घर टू घर’ जाऊन जास्तीत जास्त सभासद नोंदणी करून घ्यावी. जेणेकरून पुणे शहरातून जवळपास दहा लाख सदस्य नोंदणी पूर्ण करणे अपेक्षित आहे. त्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी जोमाने कार्य करावे.
यावेळी धीरज घाटे, जगदीश मुळीक, बापू दादा मानकर, पुनीत जोशी, प्रमोद कोंढरे, राजेंद्र आबा शिवीनकर, महेश पुंडे, गणेश कळमकर, रवींद्र सावेगावकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.