राहुल गांधी यांची गुंडागर्दी चालणार नाही…भाजपा व एनडीच्या वतीने निदर्शने

दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसने संपूर्ण देशाची माफी मागावी या मागणीसह 19 डिसेंबर रोजी भाजपा व एनडीएच्या वतीने जाहीर निदर्शने करण्यात आली. इंडिया आघाडीचे नेते व काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यासह इतर खासदारांनी आंदोलन स्थळी येऊन भाजपाचे 2 जेष्ठ खासदार व आदिवासी समाजाच्या एक महिला खासदार यांना धक्काबुक्की केली. यामुळे दोन्ही खासदार जखमी झाले असून त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले आहे.

 

 

 

राहुल गांधींच्या या असभ्य आणि गुंडप्रवृत्तीच्या विरोधात भाजपाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर त्वरित कारवाई व्हावी आणि राहुल गांधींना योग्य ती शिक्षा मिळावी, म्हणून संसदेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा गांधी पुतळा, बिरसा मुंडा पुतळा याठिकाणी भाजपा व एनडीच्या वतीने निदर्शने केली.

🤙 9921334545