सदाभाऊ खोत यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ; ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्याबाबत केली मागणी

मुंबई : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट सदाभाऊ खोत यांनी घेतली.

 

 

 

कर्नाटक राज्यामध्ये उसाला कमी रिकव्हरी असताना देखील तिथल्या साखर कारखान्यांनी ३५०० पेक्षा जास्त दर दिलेला आहे. परंतु महाराष्ट्रमध्ये चांगली रिकव्हरी असतात देखील अनेक साखर कारखान्यांनी २५०० ते ३२०० पर्यंत उसाला भाव दिलेला आहे.

ही खऱ्या अर्थाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात होणारी लूट आहे. त्यामध्ये आपण हस्तक्षेप करून ज्याप्रमाणे कर्नाटकातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भाव दिला आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील उसाला योग्य भाव देण्यात यावा, अशी विनंती केली.

🤙 9921334545