कुंभोज (विनोद शिंगे)
एम.जी. शहा विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज, बाहुबली येथे शुक्रवार १३ व १४ डिसेंबर रोजी वार्षिक क्रीडा महोत्सव अतिशय उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन व कार्यक्रमाचे अध्यक्ष चंदुलालजी ओसवाल, कोल्हापूर तर प्रमुख उपस्थिती प्रथमेश करगावे, सी.ए.-कोल्हापूर नंदू परमार, कोल्हापूर ,महेंद्र परमार, कोल्हापूर व कुबेर पाटील,कबड्डीचे राष्ट्रीय प्रशिक्षक, किणी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात प.पू गुरुदेव समंतभद्र महाराज यांच्या प्रतिमेचे फोटो व प्रतिमापूजन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. त्यानंतर शालेय विद्यार्थिनींनी मंगलाचरण व स्वागतगीत सादर केले.
अतिथी परिचय व स्वागत प्रास्ताविक प्रशालेचे उपमुख्याध्यापक अनिल हिंगलजे यांनी करून दिले. क्रीडा ध्वजपूजन प्रथमेश करगावे यांच्या शुभहस्ते तर क्रीडा ध्वजारोहण प्रशालेचे मुख्याध्यापक गोमटेश बेडगे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. तर क्रीडा ज्योत प्रज्वलन कार्यक्रमाचे अध्यक्ष चंदुलालजी ओसवाल यांच्या शुभहस्ते झाले. त्यानंतर क्रीडा शपथ क्रीडा विभागप्रमुख शरद जुगळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिली.
प्रमुख अतिथींचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व समजावले. खेळ शारीरिक आरोग्यासाठी किती आवश्यक आहे, तसेच मानसिक आरोग्यासाठीही ते कसे फायदेशीर आहेत हे स्पष्ट केले.
तसेच अतिथी मनोगत महेंद्र परमार यांनी आपल्या मनोगतामध्ये खेळात हार-जित असते, परंतु हारूनही निराश होऊ नये आणि जिंकल्यानंतर अहंकारी बनू नये हे सांगितले.खेळातून आपल्याला जीवनातील उतार-चढाव स्वीकारायला शिकवले जाते.
यानंतर व्हॉलीबॉल व कबड्डी मैदानाचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. दोन दिवसांमध्ये सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकार अतिशय उत्साहात संपन्न झाले. यामध्ये सांघिक खो-खो, कबड्डी, हॉलीबॉल तर वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये धावणे,लांब उडी, गोळा फेक, थाळीफेक इ. खेळामध्ये विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. क्रीडा महोत्सवाच्या शेवटी प्रशालेचे मुख्याध्यापकांनी अतिशय सानंदपूर्वक ध्वज खाली उतरवला.शेवटी आभार क्रीडाध्यापिका वैशाली पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन वैशाली पाटील व आशितोष व्हनवाडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे पर्यवेक्षक नेमिनाथ बाळीकाई, तांत्रिक विभाग प्रमुख रवींद्र देसाई व व्यवसाय विभाग प्रमुख अरुण चौगुले तसेच सर्व अध्यापक अध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.