कोल्हापूर : हातकणंगले येथील टोप हायस्कूल आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते व जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा आडसुळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवला पाहिजे तसेच क्रीडा क्षेत्राकडे करिअर करण्याच्या दृष्टीने बघितलं पाहिजे. असे आमदार अहोकराव मानेंनी सांगितले.
यावेळी माजी सभापती डाॅ. प्रदीप पाटील,संस्थेचे कार्याध्यक्ष दौलत पाटील,पोलीस उपनिरीक्षक कोल्हापूर प्रो कबड्डी खेळाडू महेश मगदूम,नृत्य नाट्य दिग्दर्शक उमेश चौगुले,लक्ष्मण भोसले(तात्या),शिक्षण संस्था उपाध्यक्ष गणेश पाटील,शिक्षण संस्था संचालक सुरेश पाटील,शिक्षण संस्था संचालक पोपट पाटील, मुख्याध्यापक के. बी. पाटील,पर्यवेक्षिका सौ एस आर पाटील,संतोष पाटील,आनंदा भोसले यांसह शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थीनी,पालक मोठया संख्येने उपस्थित होते..