आ. राहुल आवाडेंच्या उपस्थितीत रेंदाळ येथील विज्ञान प्रदर्शनाचे बक्षिस वितरण

कोल्हापूर : रेंदाळ येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज व शिक्षण विभाग पंचायत समिती हातकणंगले यांच्या वतीने ५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे बक्षिस वितरण व समारोप कार्यक्रम आमदार राहुल आवाडे व आमदार अशोकराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

 

 

यावेळी आमदार जयंत आसगावकर, शिक्षक नेते दादासो लाड सर, कोल्हापूर विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे, गट शिक्षणाधिकारी रवींद्रनाथ चौगुले, लोकनियुक्त सरपंच सौ. सुप्रिया पाटील, उपसरपंच अभिषेक पाटील, मा. जि. प. सदस्य विलास खानविलकर, माजी लोकनियुक्त सरपंच विजय माळी, कृष्णात पुजारी, भाजपा जिल्हा चिटणीस सचिन मेथे, भाजपा तालुका सरचिटणीस नितीन पाटील, भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पार्वती निकम, भाजपा तालुका उपाध्यक्ष शशिकांत खोत, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष उमेश तांबे, राजू नाईक, मुख्याध्यापिका सौ. व्ही. जी. पाटील, अर्जुन पाटील सर, एन. वाय पाटील सर, घुंगरे सर यांच्यासह शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थीनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.