हिंदूवर अत्याचार हा चिंतेचा विषय : संजय राऊत

मुंबई : दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी बांग्लादेशमध्ये हिंदूवर अत्याचार होत आहेत. यावर भाष्य केले आहे.

 

संजय राऊत म्हणाले, ज्याप्रकारे हिंदू समाजावर बांग्लादेशात हल्ले सुरू आहेत, त्यांना देश सोडण्यास भाग पाडले जात आहे हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. हिंदू लोकांची हत्या केली गेली, आताही हत्या सुरू आहेत. हिंदू मंदिरावर हल्ले सुरू आहेत. कोर्टात हिंदूंच्या बाजूने उभे राहिलेले वकिलांचाही हत्या होत आहेत. बांग्लादेशमध्ये हिंदूवर अत्याचार होत आहेत. हा चिंतेचा विषय असल्याचे संजय राऊत यांनी म्हटल आहे.

देशभरात आंदोलन होत आहेत, मात्र त्यात भाजप आणि राष्ट्रीय स्वयसेवक संघ कुठे दिसत नाही. स्वतःला हिंदूंचे नेते म्हणणाऱ्या नरेंद्र मोदी यांना हे चित्र विचलित करत नाही का ? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.