कोल्हापूर: ग्रामीण रुग्णालय, राधानगरी येथे नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या मोफत डायलिसीस सेवा केंद्राचा शुभारंभ आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ,प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. राधानगरी शहरामध्ये लवकरच अत्याधुनिक 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी करणार आहे.
यापुर्वी ग्रामीण भागातील लोकांना डायलेसिससाठी शहरी भागात जावे लागत होते तो त्रास आता संपला असून राधानगरी सारख्या ग्रामीण भागात सर्वप्रकारचे उपचार यापुढे मिळणार आहेत. रूग्णालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना आपुलकी व विश्वास देउन वैद्यकिय कर्मचायांनी उपचार करावेत असे आवाहन आबिटकर यांनी केले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक सुप्रिया देशमुख, माजी उपसभापती अरुणराव जाधव, वैद्यकिय अधिक्षक सुनंदा गायकवाड, वैद्यकिय अधिकारी जी.बी.गवळी, आर.एम.कांबळे, डायलेसिस विभाग प्रमुख कार्तिकेयन, तालुका आरोग्य अधिकारी आर.आर.शेट्ये, भाजपा नेते संभाजी आरडे, शिवसेना तालुकाप्रमुख तानाजीराव चौगले, विलास रणदिवे, युवा नेते दिपक शेट्टी, प्रा.चंद्ररशेखर कांबळे, राजाराम कारखान्याचे व्हा.चेअरमन गोविंद चौगले, विजयबाबा महाडिक, बाळूमामा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त संदीप मगदूम, माजी सरपंच विश्वास राऊत, राजू मगदूम, शिवाजीराव चौगले, संग्रामसिंह पाटील, आनिल बडदारे, सुहास निंबाळकर, राम कदम, विलास डवर, संजय पारकर, सचिन पालकर, युवराज पाटील, अभिजीत हुपरीकर, गनी चोचे, माजी सरपंच बशीर राऊत, फारुख नावळेकर, संग्राम पाटील, संजय पाटील, विलास पाटील, ए.बी.पाटील, सुभाष पाटील-मालवेकर, विजय ढेरे, सुनील गुरव, एच.पी.पाटील, मारुती भूगोलकर, सचिन येटाले, युवराज गिरीगोसावी, प्रवीण कोरगावकर, एमडी चौगुले, भिकाजी तोडकर, उमेश जाधव, सिताराम खाडे, यांच्यासह प्रमुख मान्यवर, ग्रामीण रुग्णालयाचे सर्व कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.