श्री कात्यायनी देवीचा वार्षिक भंडारा १ डिसेंबर रोजी

कोल्हापूर : नवदुर्गापैकी एक असलेल्या श्री कात्यायनी देवीचा रविवारी १ डिसेंबर रोजी वार्षिक भंडारा होणार आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.बालिंगा गावची ग्रामदेवता विश्वातील नवदुर्गा पैकी एक दुर्गा श्री कात्यायनी देवीचा उल्लेख केला जातो.

 

 

श्री. कात्यायनी मंदिर येथे रविवार दि. ०१ डिसेंबर रोजी सा वार्षिकमत भंडाराथ म्हणजेच विधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १ डिसेंबर रोजी सकाळी काकड आरती तसेच विधिवत पूजा, ९ वाजता धार्मिक विधी होम हवन देवीचे पुजारी राजू गुरव व वैभव गुरव यांच्या हस्ते देवीची अलंकारित पूजा
असे कार्यक्रम होणार आहे. तसेच १२ वाजता आरती, नंतर दुपारी १२.३० वाजता देवीचा वार्षिक भंडारा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

तरी सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कात्यायनी देवस्थान समिती महाप्रसाद कमिटी अध्यक्ष वसंतराव जांभळे तसेच देवस्थान उपसमिती अध्यक्ष अमर जत्राटे, खजानीस वसंतराव जांभळे, मारूती जांभळे, आनंद जाधव, पुजारी-राजू गुरव यांनी केले आहे. या धार्मिक विधी व महाप्रसाद निमित्त खासबाग मैदान ते कात्यायनीपर्यंत खास के.एम.टी. बसची सोय करणेत आली आहे.