केर्लेतील विद्यार्थी मृत्यू प्रकरणी मुख्याध्यापक व अध्यापिका निलंबित

कोल्हापूर: केर्ले (ता. करवीर) येथील जिल्हा परिषदेच्या कुमार विद्यामंदिर शाळेतील सहावीत शिकणाऱ्या स्वरूप दीपक माने( वय १३) राहणार (केर्ले पैकी मानेवाडी) या विद्यार्थ्यांच्या अंगावर शाळेचे लोखंडी गेट पडून त्याच्या डोक्याला मार लागल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार (दि. २१) रोजी घडली. या प्रकरणी पोलिंसात गुन्हा दाखल झाला असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी शाळेचे मुख्याध्यापक कृष्णात माने व अध्यापिका वंदना माने यांना निलंबित केले आहे.

 

सहा महिन्यांपासून लोखंडी गेट नादुरुस्त होते. ते धोकादायक स्थितीत ठेवल्य विद्यार्थी सुरक्षेबाबत निष्काळजीपणा केल्याचे दिसून येत असल्याचे मुख्याध्या माने यांना दिलेल्या निलंबन आदेशात म्हटले आहे. निलंबन काळात कागल पंचायत समितीमध्ये बदली केली आहे. स्वरूपला दोरी सोडून अध्यापिका माने यांनी गेट बाजूला सरकवण्यास सांगितले होते. त्यामुळे त्यांनाही जबाबदार धर सेवेतून निलंबित केले आहे. निलंबन काळात त्यांना शिरोळ पंचायत समिती मुख्यालय निश्चित केले आहे.

🤙 9921334545