जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान प्रास्ताविकेचे वाचन

कोल्हापूर: भारतीय संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.

 

यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय भोपळे आदींसह इतर विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.