`कुंभोज ग्रामपंचायतच्या पाणी टँकरला लागली गळती

कुंभोज (विनोद शिंगे)
कुंभोज (ता.हातकणंगले ) येथे गेल्या दहा वर्षापासून ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या पाणी टँकरची दुरावस्था झाली असून, सध्या अनेक नागरिक साडेतीनशे रुपये भरून काही ठिकाणी पाणी वापरण्यासाठी ग्रामपंचायतीकडून सदर टँकर नेतात परिणामी सदर टँकरला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून पाण्याच्या टाकी पासून ठिकाणापर्यंत जाईपर्यंत सदर टँकर निकामी होत असल्याने, कुंभोज परिसरातील ग्रामस्थांतून सदर टँकर बदलून ग्रामस्थांची योग्य सोय करावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे.

 

 

परिणामी सदर टँकर ला मोठ्या प्रमाणात गळती लागत असल्याने कितीही पाणी भरले तरी दहा मिनिटात सगळा टॅंकर रस्त्यावरती निकामा होत असल्याचे चित्र दिसत आहे .
सदर टँकर हा गेल्या सात वर्षांपूर्वी आणला असल्याची माहिती ग्रामपंचायत मिळाली असून त्याची दुरावस्था झाली आहे पण ग्रामपंचायतीने त्यावरती फंड लावून सदर टँकरची रिपेरी करून घ्यावी अन्यथा नवीन टॅंकर खरेदी करून ग्रामस्थांची सोय करावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे.

🤙 9921334545