कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारार्थ कदमवाडी येथे सभा पार पडली.
महाविकास आघाडी सरकारने सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. महिला, बेरोजगार, शेतकरी अशा सर्व घटनांना न्याय देण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार राजू लाटकरांना विजयी करण्याचे आवाहन केले.
माजी महापौर भीमराव पोवार, माजी नगरसेवक भारती पोवार, तौफिक मुल्लानी यांच्यासह आपचे संदीप देसाई, कॉ. अतुल दिघे, कॉ. रघुनाथ कांबळे, कॉ. सतीशचंद्र कांबळे, उदय फाळके, राजेंद्र आत्याळकर, संभाजी खवरे, संयुक्ता घाटगे, सीमा भोसले, दिपकसिंह पाटील, निलेश भोसले, उज्वला चौगुले, तात्यासो पाटील, बाजीराव जाधव, लक्ष्मण जानकर, दिलीप पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.