पाचगाव : पाचगाव हे सर्वात वेगाने नागरीकरण होणारे गाव आहे. पाचगावला विकासाचा चेहरा देण्याचे काम आमदार ऋतुराज पाटील यांनी केले आहे. आपला आमदार हा सुसंस्कृत आहे, एका विचाराने काम करणारा आणि विकासाचे व्हिजन घेऊन पुढे जाणा-या आ.ऋतुराज पाटील यांना ताकद द्या असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले. आ. ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ पाचगाव येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी उत्तराखंडचे आमदार काझी निजामुद्दीन यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. पाटील पुढे म्हणाले, आम्ही केलेल्या कामांमुळे जनतेचे पाठबळ आणि विश्वास आमच्या सोबत आहे. शेतकरी, विद्यार्थी, महिला अशा सर्वच घटकांना आमदार ऋतूराज पाटील यांनी न्याय दिला आहे. आपल्या कामातून लोकप्रतिनिधी कसा असावा हे आ.ऋतुराज पाटील यांनी दाखवून दिले आहे.
सरपंच प्रियांका संग्राम पाटील म्हणाल्या, आमदार ऋतुराज पाटील यांनी पाचगावमधील भैरवनाथ मंदिर, गावातील शाळा, रस्ते, गटर सह विविध कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे पाचगावचा खऱ्या अर्थाने विकास झाला आहे. पाचगावच्या विकासाला गती देण्यासाठी पुन्हा एकदा आमदार ऋतुराज पाटील यांना निवडून देऊया
शिवसेना (ठाकरे गट) शहरप्रमुख सुनील मोदी म्हणाले, सक्षम महाराष्ट्र आणि शाश्वत विकासासाठी महाविकास आघाडीला साथ द्या आणि आ.ऋतुराज पाटील यांना पुन्हा एकदा आमदार करा.
यावेळी दऱ्याचे वडगावच्या ग्रामपंचायत सदस्य नयना अविनाश भोसले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी गोकुळ संचालक बाबासाहेब चौगुले, जिल्हा बँकेच्या संचालिका स्मिता गवळी, शिवसेना करवीर तालुकाप्रमुख विराज पाटील, पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील, उपसरपंच अमित कदम, गीता दिलीप जाधव, कोअर कमिटी अध्यक्ष नारायण गाडगिळ, उपाध्यक्ष संजय पाटील, माजी सरपंच शांताराम पाटील, संजय शिंदे, संग्राम पोवाळकर, अभिजीत पौंडकर, अजिंक्य पाटील, सचिन पाटील, अतुल गवळी, युवराज गवळी, चंद्रकांत सस्ते, मारुती जांभळे, प्रकाश गाडगिळ, ग्रामपंचायत सदस्य दिपाली गाडगिळ, अश्विनी चिले, पोर्णिमा कांबळे, रोमा नलवडे, धनाजी सुर्वे, विजय शिंदे, यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पाचगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.