कोल्हापूर: महायुती शिवसेनेचे करवीर मतदारसंघाचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या संपर्क दौऱ्याला करवीर मतदार संघातून नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. आमदार नसताना नरके यांनी मतदारसंघात अनेक विकासकामे केली आहेत. यामुळे नरकेंच्या नेतृत्वाखाली लोक पाठिंबा देत पक्षप्रवेश करत आहेत, करवीर मतदारसंघातील आतकीरवाडी, मेंगाणेवाडी, परखंदळे (चौगुलेवाडी), घरपण, खेरिवडे, आसगांव, कळे, मरळी या ठिकाणी नरके यांनी संपर्क दौरा केला. तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला. लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद पहायला मिळतो आहे. लोकांचा हा पाठिंबा आणि उत्साह नक्कीच ताकद वाढवणारा आहे.असे मत नरके यांनी व्यक्त केले.

लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद पहायला मिळतो आहे. लोकांचा हा पाठिंबा आणि उत्साह नक्कीच ताकद वाढवणारा आहे.असे मत नरके यांनी व्यक्त केले.यावेळी महायुतीचे पदाधिकारी, विविध सामाजिक, राजकीय, सहकारी संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे पत्रकार बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
