आजरा : महाविकास आघाडीचे उमेदवार के. पी. पाटील यांना या निवडणुकीत विजयी करण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते नव्या जोमाने ताकदीने मैदानात उतरले आहेत. उमेदवार के. पी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यामध्ये के. पी. पाटील यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार करण्यात आला. महाविकास आघाडीचे समन्वयक रवींद्र भाटले यांनी बैठकीचे नियोजन केले होते.
प्रारंभी संजय येसादे यांनी स्वागत केले. प्रास्तविक करताना मुकुंददादा देसाई म्हणाले की आम्ही लोकसभा निवडणुकीत जसे राबलो तसेच या निवडणुकीत राबून ही निवडणूक जिंकून दाखवू. कार्यकर्ते मशाल हे चिन्ह घराघरात पोहचवतील.
कॉ.संपत देसाई म्हणाले, की लोकसभा निवडणुकीत आपण दोन महिने आधी प्रचाराची मोहीम संविधान बचाव रॅलीच्या निमित्ताने राबवली होती. आता मात्र आपल्याकडे फारच कमी दिवस असून नियोजनबद्ध प्रचार करणे आवश्यक आहे. त्यासाठी सगळे मिळून कामाला लागूया.
यावेळी बोलताना उमेदवार के. पी. पाटील म्हणाले,” विद्यमान आमदारांनी विकास कामांचा खेळखंडोबा करून टक्केवारीच्या खेळात स्वतःचा विकास साधला आहे. गद्दारीचा मतदार संघाला लागलेला डाग पुसण्यासाठी मी आपल्यासमोर उभा असून आपण मला विश्वासाने निवडून द्याल याची खात्री आहे.”
यावेळी डॉ रोहन जाधव, युवराज पोवार यांनीही मनोगते व्यक्त केली. यावेळी शिवसेनेचे संभाजी पाटील, उदयराज पवार, संजय सावंत, रशीद पठाण, शांताराम पाटील, रणजित देसाई, नौशाद बुड्डेखान, विक्रम देसाई, प्रभाकर कोरवी, प्रकाश मोरुस्कर, उत्तम देसाई, डी ए पाटील सर, जोतिबा चाळके, शिवाजी आधी, परेश पोतदार, जयदीप महागावकर, बाळू जोशी, शिवराज देसाई इकबाल शेख, दत्ता कांबळे, आप्पासाहेब पाटील, अजय देशमुख, काशिनाथ मोरे, सुरेश पाटील, संतोष पाटील, ऍड जावेद दिडबाग, निसार लाडजी, अमित सामंत, आरिफ खेडेकर बाकीव खेडेकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संखतेने उपस्थित होते.
दोन गाई म्हशी . .. आणि चलो एमआयडीशी
आमदार आबिटकरांनी युवकांना रोजगार निर्माण व्हावा यासाठी एमआयडीसी उभा करणे गरजेचे होते; परंतु दहा वर्षांत त्यांनी यासाठी काही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे बेरोजगार तरुणांना ‘दोन गाई म्हशी.. आणि पोटासाठी चलो शहरातील एमआयडीशी’ अशी अवस्था निर्माण झाली आहे. अशा बेरोजगारीच्या प्रश्नावर दूर्लक्ष करणाऱ्या आबिटकरांना या निवडणुकीत धडा शिकवण्याचा निर्धार करण्यात आला.