कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे )
हातकणंगले विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉक्टर क्रांतीताई सावंत ह्या मंगळवार दिनांक 29 रोजी दुपारी अकरा वाजता आपला निवडणूक अर्ज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हातकलंगले तहसीलदार कार्यालयात दाखल करणार असून, सदर निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर उपस्थित राहणार आहेत.
त्यासाठी हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील सर्वच वंचित बहुजन आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान हातकणंगले तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष जनार्दन गायकवाड रूकडी यांनी पत्रकार बैठकीत केले आहे .यावेळी सदर बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे कोल्हापूर जिल्हा तसेच हातकणंगले तालुक्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते .