चंद्रदीप नरकेंच्या उपस्थितीत पनोरे येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

कोल्हापूर :चंद्रदीप नरकेंच्या उपस्थितीत पनोरे येथील सरपंच मारुती आवजी पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी व कार्यकर्ते यांनी स्वगृही परतत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेनेचा मफलर घालूननरके यांनी सर्वांचे स्वगृही स्वागत केले. आपल्या सर्वांचा विश्वास सार्थ ठरवत, करवीरचा सर्वसमावेशक व सर्वांगीण विकासासाठी मी नेहमी कटिबद्ध असेन, असे चंद्रदीप नरके यांनी सर्वांना आश्वासन दिले.

 

 

यावेळी सरपंच मारुती आवजी पाटील यांच्यासह सुहास मारुती पाटील, विठलाई दूध संस्था पनोरेचे चेअरमन दिनकर गणपती पाटील, कृष्णात आवजी पाटील, निवास मारुती पाटील, दगडू बंडू पाटील, विठलाई सेवा संस्थेचे चेअरमन कृष्णात रामा पाटील, बाळू बाटे, ग्रामपंचायत सदस्या रेश्मा ओंकार कांबळे, उपसरपंच प्रवीण कांबळे, बाबुराव पवार, बाबाजी कदम, बाळू कांबळे, तेजस पाटील, सुवर्णा पाटील, नंदा पाटील, सरिता पाटील, सविता पाटील, योगेश चव्हाण, साहिल पाटील, रोहित पाटील , नितीन पाटील, शुभम आडनाईक, अनिकेत कुंभार यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

🤙 8080365706