मुंबई :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी पारंपारिक जाहीरनाम्या ऐवजी भाजपचा अंमलबजावणी आराखडा तयार करण्यात आला आहे.या संदर्भात मुंबई येथे जाहीरनामा समितीची बैठक संपन्न झाली.या आराखड्यासाठी एकूण 30 सदस्यांची समिती नेमली आहे. यामध्ये सहकार क्षेत्राची जबाबदारी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे दिली आहे. या अनुषंगाने सहकार क्षेत्रातील अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे यावेळी धनंजय महाडिक यांनी सुचवले व त्यावर चर्चा केली.
या अंमलबजावणी आराखड्यामध्ये राज्याच्या विकासासाठी विविध विषयांचा समावेश केला आहे. यामध्ये कृषी, सहकार, उद्योग, शिक्षण, आरोग्य, शेतकरी, महिला, युवा, गरीब, कायदा व सुव्यवस्था, सामाजिक न्याय, ज्येष्ठ नागरिक व क्षेत्र, पर्यटन, भाषा,संस्कृती, ग्रामविकास व शहरी विकास अशा विविध घटकांसाठी परिपूर्ण असा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे.
हा अंमलबजावणी आराखडा लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपाचे वरिष्ठ नेते सुधीर मनगुट्टीवार व डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाईल.