आजरा तालुक्यातील ‘सर्फनाला मध्यम प्रकल्पाचे’ पाणीपूजन कार्यक्रम प्रकाश आबिटकरांच्या हस्ते संपन्न

कोल्हापूर : आजरा तालुक्याच्या पश्चिम विभागाला बारमाही पाणी देणारा सर्फनाला मध्यम प्रकल्प पुर्णत्वास गेला असून या प्रकल्पाचे पाणीपूजन प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ,प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

 

 

यावेळी प्रकाश आबिटकर म्हणाले, हा प्रकल्प पुर्ण होणेसाठी या भागातील धरणग्रस्तांनी केलेला त्याग मी कधीही विसरणार नाही. धरणग्रस्तांच्या सर्व प्रलंबित प्रश्नांची जबाबदारी घेऊनच मी सर्फनाल्याचे पाणी पूजन करत आहे. धरणग्रस्तांचा त्याग आणि लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसह सर्व नेते मंडळींच्या सहकार्यामुळे आजचा हा दिवस उजाडला आहे. पाणी पूजन झाले असले तरी सरकारी खर्चाने शेतकऱ्यांना शेताच्या बांधापर्यंत पाणी देण्याचे काम करायचे आहे. धरणग्रस्तांसाठी जितक चांगल काम करता येईल तितक करण्याचा प्रयत्न करणार आहे.

२०१४ मध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मतदारसंघातील सर्फनाला, नागनवाडी आणि धामणी हे तीन प्रकल्प पूर्ण करणे आपले ध्येय होते. त्यादृष्टीने काम सुरू केले, गतवर्षी नागनवाडीचे पाणी पूजन झाले, यावर्षी सर्फनाल्याचे पाणी पूजन करता आले. पाणी तुम्हाला मिळणार असले तरी ही पुण्याई मात्र सदैव माझ्यासोबत राहणार आहे.असे ही ते यावेळी म्हणाले.

यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, श्रमिकमुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ.संपत देसाई, उपविभागीय अभियंता स्वाती उरुणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मुकुंदराव देसाई, उदयराज पवार, सुधीर कुंभार, शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय पाटील, राजेंद्र सावंत, तानाजी देसाई, गोविंद गुरव, जी.एम. पाटील, पारपोलीच्या सरपंच प्रियांका शेटगे, दाभिलचे सरपंच युवराज पाटील, पेरणोलीच्या सरपंच प्रियांका जाधव, खेडे सरपंच डॉ.संदीप देशपांडे, गवसे सरपंच सौ.पाटील, देवकाडगांव सरपंच सुनिल देसाई, कोरिवडे शिवाजी पाटील, हरपवडे सरपंच सागर पाटील, साळगांव धनंजय पाटील, आनंदा कुंभार, चांदेवाडी सरपंच स्वाती कोडुस्कर, हाजगोळी सविता जाधव, मसोली सरपंच चंद्रकांत गुरव, सुळेरान सरपंच शशिकांत कांबळे, खेडे सरपंच डॉ.संदिप देशपांडे, सोहाळे सरपंच सौ.डेळेकर, प्रकाश शेटगे, सुरेश मिटके, अमर ढोकरे, संतोष पाटील, अशोक मालव, प्रकाश कविटकर, रणजित पाटील यांच्यासह विविध गावचे सरपंच, सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706