कुशिरे तर्फ ठाणे येथे ४ कोटी ४४ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमीपूजन विनय कोरेंच्या हस्ते संपन्न

कोल्हापूर: कुशिरे तर्फ ठाणे (ता.पन्हाळा) येथे ४ कोटी ४४ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन व उद्घाटन आमदार डॉ.विनय कोरे व ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

कुशिरे ग्रामपंचायत इमारत बांधकाम करणे – ५० लाख,प्राथमिक शाळा खोली बांधकाम व शाळा दुरुस्ती करणे – ४० लाख,मसोबा मंदीर ते तोडकर गल्ली डांबरीकरण करणे – ३० लाख,जलजीवन मिशन नवीन आराखडा जॅकवेल व नदीवरून नवीन पाईप लाईन फिल्टर दुरुस्ती करणे – १ कोटी ८४ लाख,कुशिरे जोतिबा पादुका ते गायमुख रस्ता डांबरीकरण करणे – १ कोटी,गणेश कॉलनी डांबरीकरण रस्ता करणे – १० लाख,प्राथमिक शाळा ते स्मशानभूमी रस्ता काँक्रीटीकरण करणे – २० लाख,बिरोबा मंदिर ते गोविंदा घोरपडे घर मार्गे स्मशानभूमी रस्ता कॉक्रीटीकरण करणे – १० लाख अशा विविध विकासकामांसाठी ४ कोटी ४४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.या कामांचे भूमिपूजन व उद्घाटन आमदार डॉ.विनय कोरेव ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शंकर पाटील,पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती अनिल कंदुरकर,कुशिरे तर्फ ठाणे गावचे सरपंच बाबासो माने,उपसरपंच संतोष साबळे,माजी सरपंच अनुराधा घोरपडे,माजी सरपंच विश्वास कांबळे,ग्रामपंचायत सदस्या संगीता तोडकर,भास्कर गुरव,वैशाली कळके,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आनंदराव पाटील,माजी उपसरपंच कृष्णात पाटील,माजी उपसरपंच सर्जेराव घोरपडे,पोलीस पाटील संदीप माळवी,संजय तोडकर,संभाजी पाटील,जयसिंग कळके,उत्तम पाटील,सागर कळके,शरद कळके,अंकुश खांडेकर,जयहिंद तोडकर,इंद्रजीत खडके,सतपाल पाटील,स्वप्निल साबळे,संदिप गुरव,दिनकर गुरव,विष्णू कळके,सदाशिव कळके यांच्यासह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.