कोल्हापूर(युवराज राऊत):
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत अनेक महाविद्यालयात तासिका तत्त्वावर अनेक होतकरू तरुण अध्यापन करत असतात परंतु त्यांना तोकड्या मानधनात अध्यापन करावे लागत त्यांच्यावर अन्याय होत आहे. परंतु उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या आधिरित्या उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या अध्यापकांचे सुधारित मानधन लागू केले आहे. सध्या तासिका कालावधी, ४८/५० मिनिटाऐवजी ६० मिनिटे करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
कला वाणिज्य विज्ञान(पदवी) सुधारित दर(प्रति तासाकरिता) सैद्वांतिक-९००तर प्रात्यक्षिके -३५०. कला वाणिज्य विज्ञान (पदव्युत्तर) सैद्वांतिक-१००० प्रात्यक्षिक- ४५०
शिक्षण शास्त्र आणि शारीरिक शिक्षण (पदवी/ पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रम) सैद्वांतिक -१००० प्रात्यक्षिक -४५०. विधी (पदवी /पदव्युत्तर व्यवसायिक अभ्यासक्रम) सैद्वांतिक -१००० प्रात्यक्षिक- ४५० प्रमाणे सदर सुधारित मानधन तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या अध्यापकांना लागू करण्यात यावी. यासंबंधी शासन निर्णय आपणास जोडत आहोत. आपण देखील स्वतः लक्ष घालून असे का तत्त्वावरील अध्यापकांना सुधारित मानधन लागू होण्यासाठी सर्व महाविद्यालयांना आस्थापनाना परिपत्रक काढून नवीन सुधारित दर देण्याबाबत सूचना कराव्या या मागणीचे निवेदन उच्च व तंत्र शिक्षण कोल्हापूर विभागाचे विभागीय शिक्षण सहसंचालक डॉ. धनराज नाकाडे यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून देण्यात आले. यावेळी सदर मागणी मान्य न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा देखील देण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ज़िल्हाध्यक्ष अभिजीत राऊत, शहर अध्यक्ष अजिंक्य शिंदे, ज़िल्हा सचिव नितेश गणेशाचार्य, विभाग अध्यक्ष अमित सालुंखे, पृथ्वीराज घोडके, किरण येडगे, यश केबलें, वैभव अस्वले