कुंभोज : हातकणंगले तारदाळ रेल्वे स्टेशनवर दारूच्या नशेत असणाऱ्या विशाल अडसूळ (रा. कवठेसार) या युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परिणामी रेल्वे खाली उडी मारून आत्महत्याचा प्रयत्न करत असताना उडी मारत असताना रेल्वेच्या साईडला लागून तो बाजूला फेकला गेला व त्याचा एक पाय रेल्वेच्या रुळामध्ये अडकून तो कट झाला.

परिणामी, सदर घटना कोणाच्याच लक्षात आली नाही सदर युवक हा सकाळपासूनच हातकणंगले येथील एका बार वर दारू पीत असल्याचे काही नागरिकांना पाहिले होते , दारूच्या नशेतच सदर युवकांनी रेल्वे रुळावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला परिणामी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हे बऱ्याच वेळाने लक्षात येताच त्यांनी समर्पण रुग्णवाहिकेचे स्वप्निल नरोटे यांना पाचारण करून सदर युवकास तारदाळ येथे दाखल केली परंतु त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल ते दाखल करण्यात आले आहे सदर घटनेची नोंद पोलिसात करण्याचे काम चालू होते. .
